Wednesday 2 September 2015

राजधानीची शिकवण!



                  दिल्ली सोडून  एक वर्ष झाल..दिल्लीतील शेवटचे काही दिवस हे दिल्लीत चार वर्षाची शिकवण पुन्हा एकदा देणार ठरल.
                 2010-2014 चार वर्ष दिल्लीत काढली..लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं होत..
२०१४ लोकसभा निवडणुका झाल्या...मुंबईत परतं जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले...नोकरीच्या शोधात होते...या सगळ्यात एक समस्या अशी होती की,ज्या घरात रहात होते,तिथे साधारण लोकसभा निवडणुकीपर्यंत राहिन अशी कल्पना होती..रूममेटचं लग्न ठरलेलं...ती लग्न करून ऑगस्टमध्ये नवर्याबरोबर परत येत होती,त्यामुळे ते घरं सोडण्याशिवाय पर्याय नव्हता..चार वर्ष,चार घर झाल्यावर मलाही घराचे वेध लागलेले..पुन्हा घरं शोधा,सामान शिफ्ट करा...सगळ नकोसं झालेल...एकीकडे घर सोडण्याची डेड लाईन....दुसरीकडे नोकरी मिळेना....

रूममेट येणार म्हणून माझ टीव्ही,फ्रिज सामान दीड-दोन हजार रूपयात विकून टाकल..घरातील पुस्तक कपडे बॅगा भरल्या...एक मुव्हरर्स आणि पॅकर्स जस्ट डायल वरून शोधला...त्याला सांगितलं हे सामान मुंबईत घरी पाठवायचं,पैसे दिले,,,तो घरी आला तेव्हा असं जाता जाता म्हणाला..."आप तो अकेली है,घर में मर्द नही..कितनी परेशानी होती होगी..कैसे कर लेते है आप..." आता या माणसाला काय उत्तर द्यायचं म्हणून गप्प बसले...सामान वेळेत गेल..म्हणून टेन्शन गेल...  

           आता रहायला घरं हवं होतं...रक्षाबंधानानिमित्त पंधरा दिवस एक मैत्रिण गावी जात होती..ती म्हणाली माझ्या घरी रहा..त्यामुळे किमान पंधरा दिवस राहण्यासाठी घरं मिळाल..या दरम्यानं नोकरीचा शोध सुरू होता..घरी पाठवलेलं सामान घरी दहा दिवस होऊनही पोहचलं नव्हतं...फोन केला तर तो मुव्हर्स आणि पॅकर्सवाला फोन उचलतं नव्हता,,थोड टेन्शन आलं..
दोन-तीन दिवसाने त्याने फोन उचलला,म्हणाला,"मॅडम टेन्शन मत लो,सामान पहुंच जायेगा"
परत काही दिवस वाट पाहिली..सामान अजून पोहचल नव्हत...एकदा त्याला फोन केल्यावर तो इतक्या वाईट टोनमध्ये बोलला,"मॅडम इतना टेन्शन मत लो,आईना,जरा हम से मिलीये..बैठ के बाते करेंगे" तिथेचं डोकं खराब झालं...आणि मग त्याला शिव्या दिल्या...दिवसेंदिवस त्या माणसाशी बोलण कठीण झाल..फोन केला तर उचलणार नाही...उचलला तरं हे असं बोलण....सामान घरी पोहचलं नव्हत...परत दहा फोन केल्यावर कळलं सामान मुंबईत गोडाऊन मध्ये पडलं आहे..आणि सामान घरी शिफ्ट करण्यासाठी मी दिलेले पैसे त्याने मुंबईतल्या माणसाला दिले नव्हते..उलटं मलाचं फोन करून सांगितल,सामान घेऊन जा गोडाऊनमधून...
मग अजून चिडचिड झाली...पैसे दिले,विश्वास ठेवला आणि आपल्याला खड्ड्यात घातल..मुंबईतला मुव्हर्सवाला चांगला होता,तो म्हणाला"दीदी हमे पैसा नहीं दिया हम क्या करे" 

ह्या सगळ्या गडबडीत मुंबईत नोकरी मिळाली...लवकर दिल्ली सोडावी लागणार होती कारण पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस मैत्रिणीकडे राहत होते..ती पण गावावरून परत आलेली..तिचे घरमालक ही विचारत होते.. 
मुंबईत परत जाण्याची तयारी सुरू होती... पण मुंबईत माझं सामान गेलं नव्हतं...शेवटी त्या मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याच्या ऑफिसला नोएडामध्ये गेले...पत्ता शोधता शोधता नाकेनाऊ आले...दिलेल्या पत्त्यावर गेल्यावर धक्का बसला,तिथे त्याचं ऑफिसचं नव्हत..त्याने दिलेल्या पत्त्यावर दुसऱ्याचं एका मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याचं ऑफिस होतं...आता तर खूपचं राग आला..आपल्याला एका माणसानं फसवल..आपण शिकलेले,दिल्लीचा अनुभव नेहमीचं वाईट येऊनही आपण आपलं सामान असं दिलचं कसं...बाजूच्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी सांगितलं की त्या मुव्हर्सवाल्यानं असं अनेक महिलांना फसवलं आहे...काही महिला इथेही येऊन गेल्या आहेत...हे  ऐकून तर वाटतं होतं, आपण इतके मूर्ख कसे...कोणी आपल्याला इतक्या सहजपणे टोपी घालून जाऊ शकतो..

         शेवटी नोएडा पोलिसांकडे गेले...त्यांना सगळा प्रकार सांगितला,नोएडा रिपोर्टर पण पोलिसांशी बोलला..पोलिसांनी त्यांच्या मोबाईल वरून त्या मुव्हर्सवाल्याला फोन लावला..त्याची चौकशी केली..मग  विचारलं, हे रश्मी पुराणिकचं सामान का नाही घरी पाठवल...पैसे घेतलेस तरी सामान गोडाऊनला पडून आहे,वरून त्यांना सांगतोस सामान घेऊन जा..पोलिसांचा चढता सूर पाहताच पाच मिनीटात मुव्हर्सवाल्याने हार मानली..आजच्या आज सामान घरी पोहचवतो..असं सांगितल..पोलिस मला म्हणाले तुम्ही मला संध्याकाळी सामान घरी पोहचलं की नाही कळवा..मी जस्ट डायलाला पण फोन करून या मुव्हर्स आणि पॅकर्सवाल्याची तक्रार केली..त्याचं ऑफिस नाही,खोटा पत्ता दिलाय,सर्विस अनेकांना दिलेली नाही,वाईट भाषेत बोलतो...जस्ट डायलने मेलवरून तक्रार घेतली,त्याला डिलीस्ट करू सांगितल.

                       तिथून ऑफिसला गेले,काही काम बाकी होतं...ऑफिसमध्ये असताना त्याचा फोन आला...जो माणूस एवढे दिवस माझा फोन उचलतं नव्हता...उचलला तर अर्वाच्य भाषेत बोलतं होता..तो आता माफी मागत होता..
मला म्हणाला,"मॅडम,क्या आप..पुलिस के पास क्यू गई..मैंने आपको कहा था सामान घरं पहुंच जायेगा."
इतकचं ऐकून डोक असं सटकल....आजपर्यंत आयुष्यात ज्या शिव्या दिल्या नव्हत्या...ग.भ.भ.न ची संपूर्ण बाराखडी त्याला बोलून दाखवली आणि..सांगितलं तुझ्यासारख्या लोकांना पोलिसांची भाषा समजते..तू अनेक महिलांना फसवलं तेव्हा लाज वाटली नाही का...मग म्हणाला, इतरांचं सोडून द्या,तुमचं सामान घरी पोहचवतो..त्याचा आवाज ऐकून इतका राग येत होती की  फोन कट केला.
                      दोन तासात मुंबईत घरी सामान आलं...त्यानंतर चोवीस तासाने मी दिल्ली सोडली मुंबईसाठी...पण शेवटच्या दिवसापर्यंत दिल्ली शिकवतं राहिली...कोणावरही विश्वास ठेवू नये..

1 comment: