Monday 23 April 2012

VIRGINITY


                                                             त्या चौघी मैत्रिणी..एक-दोन महिन्यातून एका रात्री कुणाच्या तरी घरी  भेटायच्या..आणि छान गप्पा मारायच्या..आताही भेटल्या..नेहमीच्याच गप्पा..काम कस चालूये, लफडी,कोणाची लग्न,अशा गप्पा  उत्तरोत्तर वाढत गेल्या..लवकरच एकीचं लग्न होणार म्हणून  तिला मधुचंद्राची रात्र,HONEYMOONयावरून म्हणून चिडवण आणि चावट गप्पा सुरु झाल्या..आणि अचानक गाडी घसरली प्रत्येकीने आपला पहिला 'तसला' अनुभव सांगायचा..एकीने सांगितलं शाळेत असताना वर्गमित्राबरोबर तिचं पहिल KISS ,दुसरीने कॉलेजमध्ये असताना आपल्या SENIORबरोबर असलेले संबंध रंगवून सांगितले..तिसरीने आपल्याच बिल्डिंगमधल्या एका मुलाबरोबर केलेली मज्जा आणि ऐनवेळी कामवाल्या मावशीनी येऊन केलेला पचका अशा गमतीजमती सांगितल्या...आता आली चौथीची वेळ..पण चौथीने अजूनपर्यंत काहीचं केल नव्हत..अगदी साधं KISS ही केल नव्हत..तिने तसं मैत्रीणीना  सांगितल्यावर त्या सगळ्या खूप हसल्या.. ती
                                                     अजूनही VIRGIN म्हणून तिला चिडवलं..अगदी, तू नॉर्मल आहेस ना?अस ही विचारला..पण तिला समजेना ..की आपण VIRGIN आहोत तर काय झाल..म्हणजे एकतर असं कोणी भेटला नाही..CAREER च्या धावपळीत असा काही करायचा असत असा विचाराचा आला नाही..पण मैत्रिणीनी गेलेली गंमत तिला जरा खुपालीचा..तिने ठरवलं...आपण आयुष्यात सगळे अनुभव घेतले..मग हा का नाही?..सगळेजण करतात मग आपण केला तर काय होता?आणि आपण जसे इतर अनुभव घेतले तसा हाही एक अनुभव घेऊया..म्हणून तिने ठरवलं की आपण कुणाबरोबर तरी करायचा..तिने ऑफिसमधल्या सहकार्याला पकडलं..'भ्रमर' म्हणून त्याची ख्याती..मुलींनी दाणे  टाकले  की आलं कबुतर असे सगळे म्हणायचे..मग तिला वाटल हे सोप्प आहे..तिने स्वताहून गप्पा मारल्या..थोड FLIRT केला...स्वताहून हवा दिली..त्याला मिळायचा तो SIGNAL मिळालाच...मग काय त्यांचा शनिवारी DINNER चा बेत ठरला..आठवडाभर तिने  एवढा विचार केला नाही..आणि येताजाता  त्याचे इशारे तिला तर सगळीच मज्जा वाटत होती..आणि आता एकदा एखादी गोष्ट करायची म्हंटली की करायच असा तिचा खाक्या..त्यामुळे पाप -पुण्य,कर्म,नैतिकता  सगळ पोतडीत गुंडाळून तिने टाकून दिल..

                                         अखेरीस शनिवारआला..दोघही तिच्या आवडत्या हॉटेल मध्ये जेवायला गेले..त्याने अगदी  आठवडाभर तिच्या गप्पांमधून तिला अचूक टिपलेलं..तिला आवडणारी लाल गुलाबाची फुल तो घेऊन आला..तिच आवडत PERFUMEलावून  आला..आजतर तिला खुश करण्यासाठी त्याने कशाचीही कसर ठेवली नाही..तिचं आवडत जेवण,DESERT..त्याबरोबर त्याच्या  गोड गोड गप्पा..तिचं कौतुक..तिच दिसणं ,वागणं ,हसणं.. सगळं किती मोहक..असा तो वारंवार सांगत होता.ती CAREER ORIENTED,SHARP म्हणून तिचं  कौतुक..आणि ती कशी इतर मुलींपासून खूप वेगळी,म्हणून आवडणारी अशी स्तुतीसुमन उधळली.....आणि तिला ते खोट असूनही आवडलं..कारण असं प्रथमच कोणी तरी ATTENTION देतं होतं..पण त्याचवेळी तिला इतकं हसू येत होतं..नेहमी नाक वर करून चालणारे पुरुष,बायकांना अक्कल नाही,त्यांना कोण डोक्यावर बसवणार असं म्हणणारे पुरुष..एखादी बाई झोपायला मिळणार म्हणून कसा स्वतःचा स्वाभिमान गोंडाळून  ठेऊन तिची खातिरदारी करत होता..तिच्या शरीराचा,सौंदर्याचा कौतुक करत होता..आणि तेव्हा तिला जगातल्या एका महान सत्याचा शोध लागला...पुरुषांना झिकायच असेल तर अक्कल वापरून,वाद घालून उपयोग नाही.आपल्या स्त्री असण्याचा फायदा उठवायचा..सगळे मग नीट वागतात..
                                       .रात्र चढत होती..गप्पा रंगत होत्या .मग जेवण झाल्यावर ते त्याच्या रूम वर गेले..त्याने घरात तिचा खूपच छान  स्वागत केलं..पुन्हा थोड्या गप्पा..मग हळूच त्याने SLOW,ROMANTIC गाणी लावली ..दिवे मंद केले..आता मात्र तिला TENSION आला..आपण आलो खरं इथवर, पण आपल्याला जमेल ना असंच तिला वाटायला लागलं..त्याने तिला DANCE करायला बोलावलं..ती जरा टेन्शन मधेच त्याच्याकडे गेली.गाण्यावर ते DANCE करत होते..पहिल्यांदाच कुणाच्या इतक जवळ गेल्यामुळे HEART BEAT वाढत गेले..त्याचा श्वास तिला तिच्या गालावर..मग मानेवर जाणवत होता..तिला स्वतःलाही खूप काहीतरी वेगळ,गोड जाणवत होता...त्यांच्यातल अंतर कमी होऊ लागल..पण तिच्या मनात मात्र विचार येऊ लागले..हे ठीक आहे ना..म्हणजे आपण हे का करतोय,हे सिद्ध करायला की आपण NORMAL आहोत..आपल्याला पण अशा   आहेत म्हणून..की अजूनही आपण VIRGIN ..कोणी आपल्याला चिडवू नये...किंवा आपल्याकडेही असाच थ्रिल्लिंग अनुभव असावा म्हणून..पण हा अनुभव असाच हवा का? आपण असं कुणाला मुद्दाम भुरळ पडून,वापरून घेणं किंवा स्वतःला वापरून देणं योग्य का?डोक्यात एवढे विचार आणि त्याने तिला एकदम जवळ घेऊन KISS करायला सुरवात केली..तिच्या अंगावर एकदम शहारा..सरसर डोक्यापर्यंत चमक गेली..आणि तिला अचानक आजीचे शब्द आठवले, सगळेजण सगळ्या गोष्टी करतात म्हणून आपणही तसंच करायला हवे,असं काही नसत...एखादी कृती केल्यावर जर आपण स्वतःला आरशात बघू शकतो याची खात्री असेल तर मग ती गोष्ट बिनधास्त करावी ...आणि अचानक ती भानावर आली..तिच्या शरीरावर मोहर उठविणारे त्याचे ओठ..आणि BRAपर्यंत त्याचा पोहचलेला हात..तिने त्याला एकदम थांबवलं..आणि ती त्याला म्हणाली,मला हे जमणार नाही...ती तिथून पळून गेली...रिक्षात बसल्यावर तिचं तिलाच रडू आला..की आपण इतक्या खालच्या पातळीवर उतरलोच कसे?

मन !कुठे असते?

                                    मी बघत होते...वेदना होत आहेत...कळत होतं ..जाणवत होतं की आत्ता थांबावं...विनाशाकडे चाललोय!!पण नाही.. पुन्हा आतून आवाज आला, थांब अजून थोडा वेळ !!संयम ठेव...होईल बदल ...पण तसं काही झालाच नाही...उलट ती जखम आतमध्ये कापतच गेली...आणि काही कळायच्या आत, खोल दरीत कोणी ढकलून दिलं!जमेल तिथे,जमेल ते पकडण्याचा प्रयत्न केला..कुठे तरी काही तरी हाताला लागेल..कुठे तरी चमत्कार होईल...पण नाही चमत्कार होईल ही अंधश्रद्धाचं ठरली....
                                घुसमट होऊ लागली,वेदना वाढूच लागल्या...श्वास घेता येईना...मग पर्यायाच उरला नाही...जगायचं असेल तर आतमध्ये जे सारखं दुखत असतं, जे उगीचं तुमच्या जिवंत असण्याची जाणीव करून देत असतं त्याला मारायचं ठरवलं...ते , जे व्यक्त होतं,जे माणूस म्हणून जगायला शिकवतं आणि कधी कधी जगणं अवघड करतं....तेच ते मन !!बुद्धीला तर ते कधी पटलंच नाही..त्याने आदेश दिला...कापून काढ बघतेस काय??सरसर आतमध्ये कापत गेले ...त्याच्या वेदना इतक्या झाल्या की नुसता आकांत केला...मन पिळवटून उठलं,त्याने विरोध केला पण त्याची आर्त साद माझ्याच भोवती घुमत राहिली...तिथेच रक्तात पडून होते...तडफडत...किती दिवस माहित नाही...पण आज ती जखम मात्र छान भरून आलीये!!!

Wednesday 18 April 2012

ENCLOSURE!


                                                 प्रेम,CRUSH,INFATUATION हे न कळण्याच्या वयात तो भेटला..शाळेतला मित्र..निबंध स्पर्धेत खरी स्पर्धा करणारा,इतिहास या विषयात रमणारा! असा तो वेगळाच..म्हणून आवडला.नेहमी दादागिरी करत फिरणारी ती चक्क मुलींसारखी वागू लागली..आरशात पाहू लागली..नटू लागली,पहिलं प्रेमपत्र लिहिलं...'फुलले रे क्षण' गाताना फुलण्याचा अनुभव तिने  स्वतः घेतला...त्याला एकदा पाहायला मिळावं म्हणून तो राहायचा त्या भागात फेर्या वाढल्या...शेवटी न राहवून  तिने त्याला बिनधास्त प्रपोज केलं..आणि तो काही दिवसांनी 'हो' म्हणाला देखील..ती खूश..पण 'हो' म्हणाला, म्हणजे पुढे काय हे समजण्याच्या आत, तो तिला म्हणाला 'माझं उत्तर नाहीये आता!' तिला कळेनाच..अरे म्हणजे काय? हे नेमक काय झालं! आपली काही चूक झाली? याचा विचार करून करून ती थकली..आयुष्यात पहिल्यांदा तिला अचानक वेदना,दुःख या शब्दांचा अर्थ जाणवला..के के 'तडप तडप के' गाताना त्याचा अर्थ तिने जगला...असं का झालं?आपण कमी पडलो का?याचा राग इतका मग तिने त्याच्याशी असलेले सगळे मित्र-मैत्रिणी,ते गाव सगळंच तोडलं..त्याची ख्याली खुशाली जराही कळू नये म्हणून ती सगळ्यांपासून पळून गेली.
                            .पण मनाला त्रास देणारे प्रश्न मात्र तिथेच!मधून मधून ते प्रश्न पुन्हा पुन्हा भेटत राहिले,वेगवेगळ्या वळणावर,वेगवेगळ्या रुपात भेटतं राहिले,  ती उत्तर आपल्यापरीने  शोधात राहिली..तिला आता प्रश्नांचाही कंटाळा आला..तिने त्यांच्यापासूनही पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला! अशीच काही वर्ष गेली..एकदा शाळेच्या जुन्या मित्रांनी एक कार्यक्रम केला..इतक्या वर्षांनी ती भीत भीत तिथे गेली..तिथे तो दिसला..त्याला पाहून डोक्यातले ते  प्रश्न उडी मारून वर आले..पण  बोलण्याची तिची हिंमत नव्हती म्हणून ते  प्रश्न घेऊन सहा वर्षांनी ती पुन्हा  परत फिरली!ORKUTवर मग  तो पुन्हा कधीतरी भेटला..आधी एकमेकांना MSGही केला नाही..टाळणंच होतं ते...एकदा कधी तरीCHATTING ला सुरुवात झाली..पण तेव्हाही आयुष्य कसं चालूये,कसं चालूये यापलीकडे चौकशी नाही..हळूहळू SHARING वाढत गेलं... चांगल्या कविता,छान काही वाचलं तर पुस्तकांवर चर्चा सुरु झाली...थांबलेलं बोलण CHATTING,MAILवरून थोडं पुढे गेलं.. त्याचं लग्न,संसाराची माहिती कळत गेली....या इतक्या वर्षात जुनी जखम उरली नव्हती ..जे झालं त्याची अढी तर कधीच नव्हती..प्रश्न तर कधीच संपलेले..त्यामुळे उत्तरांची अपेक्षा नव्हती!त्याचा सुखी संसार पाहून तिलाच आनंद झाला...पण तरीही कुठेतरी काहीतरी अडकलंय, छळंतय  हे तिला कळत होतं! पण ते काय?
                          आणि अचानक अकरा वर्षांनी त्याचा एका संध्याकाळी फोन आला..ती SURPRISED! ...अकरा वर्षांनी त्याचा आवाज ऐकला...खूप काही बोलता आलं नाही..अगदी जुजबीच गप्पा...बायकोची चौकशी,घरच्यांची,नोकरीची चौकशी..पण तरीही  तिला आतून आनंद झाला..अकरा वर्षापूर्वी शेवटचं त्याचा वाक्य होतं.." माझं उत्तर नाहीये आता!"..अकरा वर्षानंतर तो म्हणाला,"फोन करायचा होता पण जमलं नाही..पण आता  वाटलं ..Its high time,तुला फोन केला पाहिजे!" .आणि तेव्हा तिला जाणवलं इतके वर्ष  ती ENCLOSUREच्या शोधात होती...जे त्रास कुठेतरी अडकून होतं..ते अखेरीस मिळालं! 

Wednesday 4 April 2012

संसार-मी नवरा!


                                             PGमध्ये एकात राहून कंटाळा आला होता.संध्याकाळी घरी आल्यावर त्या छोट्याश्या खोलीत,अंधारात घरी जाणं जीवावर यायचं!म्हणून ठरवलं आता भाड्याच्या घरात कोणाबरोबर तरी राहू..तशी सुदैवाने मैत्रीणही मिळाली.सगळे सोपस्कर पार पडले..एकत्र राहण्याचा पहिला दिवस होता-रविवार.रविवारी नेहमी उशिरा उठणं..काहीतरी खाणं, टी.व्ही पाहणं आणि पुन्हा झोपणं हा ठरलेला कार्यक्रम आहे.पण त्या दिवशी अगदी उत्साहात ROOMMATE सकाळी उठवलं..आज घराची साफ सफाई करूया,कपाट लावूया.म्हणजे झोपेतून रविवारी कोणी उठवलं तर राग येतो..आणि हे असं आईच करते.क्षणभर वाटलं..आई आली की काय हिच्यात! पण पहिलाच दिवस भांडण नको,आणि मुद्दा योग्य म्हणून झोप सोडून उठले.मग कामाची वाटणी केली.आम्ही आमची काम करत होतो. आईला जेव्हा फोनवरून कळलं कि चक्क रविवारी लवकर उठून काम करतेय,तिला अत्यानंद झाला..आणि मला धडकी भरली!
                          आता आम्ही काम करत असताना  ROOMMATE मध्येच येऊन, अगं इथे डाग राहिलाय,तिथे जरा हात मार...अशा सूचना देत होती.मी शांत ऐकून घेतलं..संध्याकाळी शेवटी बाहेर बाजारात किरण समान आणायला गेलो,तेव्हा तिला सांगितलं, काही कर पण काम करताना सूचना देऊ नको..मी तुझ्या कामात लुडबुड करणार नाही,तू माझ्या कामात लुडबुड करू नको...दुपारी जेवल्यावर ती 'हम दिल दे चुके सनम' पाहत होती आणि मला इंग्लिश सिरीयल पहायची होती..आणि तेव्हाच मला कळलं,घरात झाली तरी टीव्हीवरून भांडण होण्याची शक्यता आहे! म्हणून आपण वेळ वाटून घेण योग्य!असे आमचे जरा एकमेकांना समजून घेऊन दिवस जात होते..आता ऑफिसमधून संध्याकाळी घरी आल्यावर ती हिंदी सिरियल्स पाहते.संध्याकाळी आठ ते अकरा सगळ्या सौ-सुना असतात!मी रात्री मग मराठी बातम्या,सिरियल्स,इंग्लिश सिरियल्स पाहते.आता सास-बहु सिरियल्स मध्ये नसल्यामुळे मी जेवताना पेपर वाचते किंवा पुस्तक वाचत बसते..तर तिने एकदा खाडकन पेपरवर हात मारला,आणि रागावली-काय हे संध्याकाळी तू घरी आल्यावर माझ्याशी बोलत नाहीस..पेपर मध्ये डोक खुपसून बसते! आणि मी इतकी दचकले..ती खो खो करून हसत बसली. मी थोड्यावेळाने तिला सांगितलं..काहीही कर पण असले EMOTIONAL DIALOGUES माझ्यावर मारू नको.त्रास होतो..
                         आता एकदा तिने अशीच एक भाजी केली होती..आता ती नेहमीच छान जेवण बनवते..प्रश्नच येत नाही..आम्ही जेवत होतो..ती मध्येच माझ्याकडे पाहत होती..मी पहिला कळेना..जेवताना माझ्याकडे का पाहतेय..शेवटी वीस मिनिटाने ती चिडून बोलली,भाजी कशी झालीये,सांगता येत नाही का? मी अवाक-अरे म्हणजे आता ती नेहमीच चांगला स्वयंपाक करते..दररोज काय सांगायचं,कसा झालंय ते..मी बघून म्हंटल ..चांगली झालीये ग..चूक झाली सांगितलं नाही! म्हणजे सवय नाही.मग ती चिडली..मी नाही सांगत का तुला तू काही केलंस की चांगल झालंय,म्हणून! मी पुढे शब्द न उच्चारता शांतपणे तीच कौतुक करत करत जेवले!
                         आमचे स्वभाव विशेष वेगवेगळे..म्हणजे घर साफ करणं,जेवण करणं, खूप वेळ आरशासमोर उभं राहून तयार व्हायला वेळ लावणं,रस्त्यात दिसेल तिथे गोलगप्पे खाणं,सतत शोप्पिंग करणं..म्हणजे ती...घरात सिलेंडर उचलून आणण,सामानाच्या पिशव्या उचलणं, टीव्हीवर तिच्या सास -बहुच्या सिरियल्सची खिल्ली उडवणं, पिझ्झा-ब्रेड- खाणं,तिच्यासाठी शोपिंगाला गेल्यावर दहा दुकानात फिरून कसं काय वाटत यावर प्रतिक्रिया देणं- म्हणजे मी! तिच्याबरोबर अनेकदा राहताना मी आईचंबरोबर असल्याचा भास होतो..इतकी कधीकधी ती डोक्यावर बसते! 
                          आमच्यासारखीच अजून एक मैत्रीण तिच्या ROOMMATE बरोबर राहते..तिने एकदा आम्हाला विचारलं..तुमच्यात नवरा कोण आणि बायको कोण..मी म्हंटल म्हणजे काय..तर ती म्हणाली तुमच्यात जेवण कोण बनवत ,जड समान कोण उचलत, रिमोट कुणाच्या हातात जास्तवेळ असतो,कोण चिडल की अंगावर ओरडत..त्यावरून कोण नवरा आणि कोण बायको हे ठरत..आणि मला साक्षात्कार झाला..माझा नवरा झालेला आहे! कारण तिला राग आला की ती भांडी आदळते,आवाजाची पट्टी वाढते..आणि मग मी माझा राग घालवण्यासाठी शांत व्हायला बागेत निघून जाते. मला स्वयंपाक घरात काही येत नाही म्हणून ती स्वयंपाकाचे धडे देते.ती सास-बहुच्या सिरियल्स पाहून हुरळून जाते.सिरियल्स मधील कपडे,साड्या, पावसातले Romantic scenes सगळ तिला आवडत..आणि मी काय बकवास दाखवतात असं बोलून टीका करते! ती अतिशय चांगला स्वयंपाक बनवते-आणि मी छान भांडी घासते..ती स्वतःचे कपडे धुवू शकते-मला कपडे धुता येत नाही. आणि ती अशी नेहमी मला आमच्या या relationची जाणीव करून देत राहते.कितीही राग आला तरी अंगावर ओरडून बोलू नको-ही सूचना अनेकदा देऊन ही ती पाळत नाही.आणि माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेत राहते! तमाम नवर्यानं साष्टांग दंडवत...तुमच्या व्यथा-वेदना मला कळल्या हो !