Wednesday 18 April 2012

ENCLOSURE!


                                                 प्रेम,CRUSH,INFATUATION हे न कळण्याच्या वयात तो भेटला..शाळेतला मित्र..निबंध स्पर्धेत खरी स्पर्धा करणारा,इतिहास या विषयात रमणारा! असा तो वेगळाच..म्हणून आवडला.नेहमी दादागिरी करत फिरणारी ती चक्क मुलींसारखी वागू लागली..आरशात पाहू लागली..नटू लागली,पहिलं प्रेमपत्र लिहिलं...'फुलले रे क्षण' गाताना फुलण्याचा अनुभव तिने  स्वतः घेतला...त्याला एकदा पाहायला मिळावं म्हणून तो राहायचा त्या भागात फेर्या वाढल्या...शेवटी न राहवून  तिने त्याला बिनधास्त प्रपोज केलं..आणि तो काही दिवसांनी 'हो' म्हणाला देखील..ती खूश..पण 'हो' म्हणाला, म्हणजे पुढे काय हे समजण्याच्या आत, तो तिला म्हणाला 'माझं उत्तर नाहीये आता!' तिला कळेनाच..अरे म्हणजे काय? हे नेमक काय झालं! आपली काही चूक झाली? याचा विचार करून करून ती थकली..आयुष्यात पहिल्यांदा तिला अचानक वेदना,दुःख या शब्दांचा अर्थ जाणवला..के के 'तडप तडप के' गाताना त्याचा अर्थ तिने जगला...असं का झालं?आपण कमी पडलो का?याचा राग इतका मग तिने त्याच्याशी असलेले सगळे मित्र-मैत्रिणी,ते गाव सगळंच तोडलं..त्याची ख्याली खुशाली जराही कळू नये म्हणून ती सगळ्यांपासून पळून गेली.
                            .पण मनाला त्रास देणारे प्रश्न मात्र तिथेच!मधून मधून ते प्रश्न पुन्हा पुन्हा भेटत राहिले,वेगवेगळ्या वळणावर,वेगवेगळ्या रुपात भेटतं राहिले,  ती उत्तर आपल्यापरीने  शोधात राहिली..तिला आता प्रश्नांचाही कंटाळा आला..तिने त्यांच्यापासूनही पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला! अशीच काही वर्ष गेली..एकदा शाळेच्या जुन्या मित्रांनी एक कार्यक्रम केला..इतक्या वर्षांनी ती भीत भीत तिथे गेली..तिथे तो दिसला..त्याला पाहून डोक्यातले ते  प्रश्न उडी मारून वर आले..पण  बोलण्याची तिची हिंमत नव्हती म्हणून ते  प्रश्न घेऊन सहा वर्षांनी ती पुन्हा  परत फिरली!ORKUTवर मग  तो पुन्हा कधीतरी भेटला..आधी एकमेकांना MSGही केला नाही..टाळणंच होतं ते...एकदा कधी तरीCHATTING ला सुरुवात झाली..पण तेव्हाही आयुष्य कसं चालूये,कसं चालूये यापलीकडे चौकशी नाही..हळूहळू SHARING वाढत गेलं... चांगल्या कविता,छान काही वाचलं तर पुस्तकांवर चर्चा सुरु झाली...थांबलेलं बोलण CHATTING,MAILवरून थोडं पुढे गेलं.. त्याचं लग्न,संसाराची माहिती कळत गेली....या इतक्या वर्षात जुनी जखम उरली नव्हती ..जे झालं त्याची अढी तर कधीच नव्हती..प्रश्न तर कधीच संपलेले..त्यामुळे उत्तरांची अपेक्षा नव्हती!त्याचा सुखी संसार पाहून तिलाच आनंद झाला...पण तरीही कुठेतरी काहीतरी अडकलंय, छळंतय  हे तिला कळत होतं! पण ते काय?
                          आणि अचानक अकरा वर्षांनी त्याचा एका संध्याकाळी फोन आला..ती SURPRISED! ...अकरा वर्षांनी त्याचा आवाज ऐकला...खूप काही बोलता आलं नाही..अगदी जुजबीच गप्पा...बायकोची चौकशी,घरच्यांची,नोकरीची चौकशी..पण तरीही  तिला आतून आनंद झाला..अकरा वर्षापूर्वी शेवटचं त्याचा वाक्य होतं.." माझं उत्तर नाहीये आता!"..अकरा वर्षानंतर तो म्हणाला,"फोन करायचा होता पण जमलं नाही..पण आता  वाटलं ..Its high time,तुला फोन केला पाहिजे!" .आणि तेव्हा तिला जाणवलं इतके वर्ष  ती ENCLOSUREच्या शोधात होती...जे त्रास कुठेतरी अडकून होतं..ते अखेरीस मिळालं! 

1 comment:

  1. रश्मी, छान लिहिलंयस..आवडलं..

    ReplyDelete