Wednesday 4 April 2012

संसार-मी नवरा!


                                             PGमध्ये एकात राहून कंटाळा आला होता.संध्याकाळी घरी आल्यावर त्या छोट्याश्या खोलीत,अंधारात घरी जाणं जीवावर यायचं!म्हणून ठरवलं आता भाड्याच्या घरात कोणाबरोबर तरी राहू..तशी सुदैवाने मैत्रीणही मिळाली.सगळे सोपस्कर पार पडले..एकत्र राहण्याचा पहिला दिवस होता-रविवार.रविवारी नेहमी उशिरा उठणं..काहीतरी खाणं, टी.व्ही पाहणं आणि पुन्हा झोपणं हा ठरलेला कार्यक्रम आहे.पण त्या दिवशी अगदी उत्साहात ROOMMATE सकाळी उठवलं..आज घराची साफ सफाई करूया,कपाट लावूया.म्हणजे झोपेतून रविवारी कोणी उठवलं तर राग येतो..आणि हे असं आईच करते.क्षणभर वाटलं..आई आली की काय हिच्यात! पण पहिलाच दिवस भांडण नको,आणि मुद्दा योग्य म्हणून झोप सोडून उठले.मग कामाची वाटणी केली.आम्ही आमची काम करत होतो. आईला जेव्हा फोनवरून कळलं कि चक्क रविवारी लवकर उठून काम करतेय,तिला अत्यानंद झाला..आणि मला धडकी भरली!
                          आता आम्ही काम करत असताना  ROOMMATE मध्येच येऊन, अगं इथे डाग राहिलाय,तिथे जरा हात मार...अशा सूचना देत होती.मी शांत ऐकून घेतलं..संध्याकाळी शेवटी बाहेर बाजारात किरण समान आणायला गेलो,तेव्हा तिला सांगितलं, काही कर पण काम करताना सूचना देऊ नको..मी तुझ्या कामात लुडबुड करणार नाही,तू माझ्या कामात लुडबुड करू नको...दुपारी जेवल्यावर ती 'हम दिल दे चुके सनम' पाहत होती आणि मला इंग्लिश सिरीयल पहायची होती..आणि तेव्हाच मला कळलं,घरात झाली तरी टीव्हीवरून भांडण होण्याची शक्यता आहे! म्हणून आपण वेळ वाटून घेण योग्य!असे आमचे जरा एकमेकांना समजून घेऊन दिवस जात होते..आता ऑफिसमधून संध्याकाळी घरी आल्यावर ती हिंदी सिरियल्स पाहते.संध्याकाळी आठ ते अकरा सगळ्या सौ-सुना असतात!मी रात्री मग मराठी बातम्या,सिरियल्स,इंग्लिश सिरियल्स पाहते.आता सास-बहु सिरियल्स मध्ये नसल्यामुळे मी जेवताना पेपर वाचते किंवा पुस्तक वाचत बसते..तर तिने एकदा खाडकन पेपरवर हात मारला,आणि रागावली-काय हे संध्याकाळी तू घरी आल्यावर माझ्याशी बोलत नाहीस..पेपर मध्ये डोक खुपसून बसते! आणि मी इतकी दचकले..ती खो खो करून हसत बसली. मी थोड्यावेळाने तिला सांगितलं..काहीही कर पण असले EMOTIONAL DIALOGUES माझ्यावर मारू नको.त्रास होतो..
                         आता एकदा तिने अशीच एक भाजी केली होती..आता ती नेहमीच छान जेवण बनवते..प्रश्नच येत नाही..आम्ही जेवत होतो..ती मध्येच माझ्याकडे पाहत होती..मी पहिला कळेना..जेवताना माझ्याकडे का पाहतेय..शेवटी वीस मिनिटाने ती चिडून बोलली,भाजी कशी झालीये,सांगता येत नाही का? मी अवाक-अरे म्हणजे आता ती नेहमीच चांगला स्वयंपाक करते..दररोज काय सांगायचं,कसा झालंय ते..मी बघून म्हंटल ..चांगली झालीये ग..चूक झाली सांगितलं नाही! म्हणजे सवय नाही.मग ती चिडली..मी नाही सांगत का तुला तू काही केलंस की चांगल झालंय,म्हणून! मी पुढे शब्द न उच्चारता शांतपणे तीच कौतुक करत करत जेवले!
                         आमचे स्वभाव विशेष वेगवेगळे..म्हणजे घर साफ करणं,जेवण करणं, खूप वेळ आरशासमोर उभं राहून तयार व्हायला वेळ लावणं,रस्त्यात दिसेल तिथे गोलगप्पे खाणं,सतत शोप्पिंग करणं..म्हणजे ती...घरात सिलेंडर उचलून आणण,सामानाच्या पिशव्या उचलणं, टीव्हीवर तिच्या सास -बहुच्या सिरियल्सची खिल्ली उडवणं, पिझ्झा-ब्रेड- खाणं,तिच्यासाठी शोपिंगाला गेल्यावर दहा दुकानात फिरून कसं काय वाटत यावर प्रतिक्रिया देणं- म्हणजे मी! तिच्याबरोबर अनेकदा राहताना मी आईचंबरोबर असल्याचा भास होतो..इतकी कधीकधी ती डोक्यावर बसते! 
                          आमच्यासारखीच अजून एक मैत्रीण तिच्या ROOMMATE बरोबर राहते..तिने एकदा आम्हाला विचारलं..तुमच्यात नवरा कोण आणि बायको कोण..मी म्हंटल म्हणजे काय..तर ती म्हणाली तुमच्यात जेवण कोण बनवत ,जड समान कोण उचलत, रिमोट कुणाच्या हातात जास्तवेळ असतो,कोण चिडल की अंगावर ओरडत..त्यावरून कोण नवरा आणि कोण बायको हे ठरत..आणि मला साक्षात्कार झाला..माझा नवरा झालेला आहे! कारण तिला राग आला की ती भांडी आदळते,आवाजाची पट्टी वाढते..आणि मग मी माझा राग घालवण्यासाठी शांत व्हायला बागेत निघून जाते. मला स्वयंपाक घरात काही येत नाही म्हणून ती स्वयंपाकाचे धडे देते.ती सास-बहुच्या सिरियल्स पाहून हुरळून जाते.सिरियल्स मधील कपडे,साड्या, पावसातले Romantic scenes सगळ तिला आवडत..आणि मी काय बकवास दाखवतात असं बोलून टीका करते! ती अतिशय चांगला स्वयंपाक बनवते-आणि मी छान भांडी घासते..ती स्वतःचे कपडे धुवू शकते-मला कपडे धुता येत नाही. आणि ती अशी नेहमी मला आमच्या या relationची जाणीव करून देत राहते.कितीही राग आला तरी अंगावर ओरडून बोलू नको-ही सूचना अनेकदा देऊन ही ती पाळत नाही.आणि माझ्या सहनशक्तीची परीक्षा घेत राहते! तमाम नवर्यानं साष्टांग दंडवत...तुमच्या व्यथा-वेदना मला कळल्या हो !  

1 comment:

  1. मस्त लिहिलंयस गं रश्मी..बाहेर राहणाऱ्या पोरींना कळेल असं..!

    ReplyDelete