Monday 23 April 2012

मन !कुठे असते?

                                    मी बघत होते...वेदना होत आहेत...कळत होतं ..जाणवत होतं की आत्ता थांबावं...विनाशाकडे चाललोय!!पण नाही.. पुन्हा आतून आवाज आला, थांब अजून थोडा वेळ !!संयम ठेव...होईल बदल ...पण तसं काही झालाच नाही...उलट ती जखम आतमध्ये कापतच गेली...आणि काही कळायच्या आत, खोल दरीत कोणी ढकलून दिलं!जमेल तिथे,जमेल ते पकडण्याचा प्रयत्न केला..कुठे तरी काही तरी हाताला लागेल..कुठे तरी चमत्कार होईल...पण नाही चमत्कार होईल ही अंधश्रद्धाचं ठरली....
                                घुसमट होऊ लागली,वेदना वाढूच लागल्या...श्वास घेता येईना...मग पर्यायाच उरला नाही...जगायचं असेल तर आतमध्ये जे सारखं दुखत असतं, जे उगीचं तुमच्या जिवंत असण्याची जाणीव करून देत असतं त्याला मारायचं ठरवलं...ते , जे व्यक्त होतं,जे माणूस म्हणून जगायला शिकवतं आणि कधी कधी जगणं अवघड करतं....तेच ते मन !!बुद्धीला तर ते कधी पटलंच नाही..त्याने आदेश दिला...कापून काढ बघतेस काय??सरसर आतमध्ये कापत गेले ...त्याच्या वेदना इतक्या झाल्या की नुसता आकांत केला...मन पिळवटून उठलं,त्याने विरोध केला पण त्याची आर्त साद माझ्याच भोवती घुमत राहिली...तिथेच रक्तात पडून होते...तडफडत...किती दिवस माहित नाही...पण आज ती जखम मात्र छान भरून आलीये!!!

No comments:

Post a Comment