Sunday 1 December 2013

दिल्लीतील मनसे-आम आदमी पक्ष ?

             
              दिल्ली विधानसभा निवडणुकी इतकी चुरशीची निवडणुक सध्या कुठलीचं नाही...कॉग्रेसविरोधात नाराजी, भाजपाचं चाचपडण आणि आम आदमी पार्टीचं या दोघांनाही आव्हान..
   खूप वर्षापासून दिल्लीत राहणारे ज्येष्ठ पत्रकारांशी बोलल्यावर ते सांगतात, दिल्लीत आधी राजकारण पंजाबी मतदारांवर अवलंबून होत...पण गेल्या वीस वर्षात उत्तर प्रदेश आणि बिहारची लोकसंख्या वाढली..याचा फायदा कॉग्रेसने घेतला..शीला दीक्षित या माहेरच्या पंजाबी, लग्नानंतर यूपीचे नेते उमाकांत दीक्षित यांची सून..त्यामुळे त्यांनी पंधरा वर्ष सत्ता गाजवली..

           पण आता या निवडणुकीत मात्र शीला दीक्षित यांना सगळचं कठीण दिसतयं...तसं बघितलं तर शीला दीक्षित यांना वैयक्तिक पातळीवर मुख्यमंत्री म्हणून आजही लोकप्रियता आहे..पण यूपीए सरकारच्या विरोधातील नाराजीचा सगळ्यात जास्त फटका त्यांना बसलाय..राहुल गांधीच्या सभा,याचं उदाहरण..

            कॉग्रेसविरोधात जर इतकं मत असलं तरी त्याचा फायदा भाजपाला होताना दिसतं नाहीये..कारण आम आदमी पक्ष!!!
भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून जे काही मतभेद होते, ते सगळ्यांनाच दिसलं..पण आम आदमी पक्षाने प्रचारापासून,ते जाहीरनामा घोषित करण्यापर्यंत कधीचं आघाडी घेतली होती.. असं असलं तरी अण्णा हजारे यांच्या पत्रानंतर आणि 'आप'च्या उमेदवारांच्या स्टींग ऑपरेशन नंतर मात्र मतदार ही साशंक झाले आहेत..याचा फटका आम आदमी पक्षाला नक्कीचं बसलाय.

दिल्लीत आम आदमी पक्षाविषयी जितकं आकर्षण आहे,तितकचं आकर्षण लोकांना नरेंद्र मोदींचही आहे..मत कोणाला देणार याचं उत्तर केजरीवाल किंवा नरेंद्र मोदी हेचं येत...हे खूपचं विचित्र आहे..

             सरकारी नोकरी सोडून राजकारणात आलेले अरविंद केजरीवाल आणि चहा विकून,मेहनत करून इथंवर पोहचलेले नरेंद्र मोदी यांच्याविषयी तरूणांमध्ये आकर्षण तर आहेच..पण इतरांमध्येही आहे..यावेळी पहिल्यांदा मतदान करणार्या तरूणांची संख्या जास्त आहे( त्यातील किती जण खरचं मतदान करणार, हा वेगळा प्रश्न आहे)

           आम आदमी पक्षाविषयी विरोधक मुद्दा मांडतात, आमच्यापेक्षा ते वेगळ कसे...आम्ही ज्यांना तिकीट नाकारली..त्यांनीचं त्यांनी तिकीट दिली..त्यात राजकीय विश्लेषक म्हणतं आहेत,ज्या मतदारसंघात आम आदमी पक्षाचा उमेदवार खास नाही,तिथं ती मत भाजपाला जातील.

            आम आदमी पक्षाचीं मदार पण अरविंद केजरीवाल या एकाच नेत्यावर आहे...जशी मनसेची राज ठाकरेंवर
एकचं नेता प्रसिध्द,ज्याची जनमानसात ओळख आहे,ज्याला लोक ऐकतात,प्रतिसाद देतात...दुसऱ्या फळीत नेतृत्त्व कुठे आहे ..आम आदमी पक्षातील कार्यकर्ते मात्र सगळेचं तरूण असल्यानं उत्साह दांडगा आहे..सोशल मीडियावर भाजपा इतकेचं ते ही आक्रमक आहेत..अरविंद केजरीवाल यांचे रेकोर्डेड संदेश मोबाईल वर येतात...

             दिल्लीच्या एफएम वाहिन्यांवर तर सध्या राजकीय नेत्यांचेच संदेश येतात..एका ब्रेकमध्ये अरविंद केजरीवाल,नरेंद्र मोदी,राजनाथ सिंह,नितीन गडकरी,शीला दीक्षित सगळेचं येऊन मत मागून जातात...असं असताना मतदार गोंधळणार नाही तर काय?

         तर एकूणच या निवडणुकीत आम आदमी पक्षाला किती मत पडतात किंवा त्या मतांमधून किती जागा मिळतात हेचं खूप महत्त्वाचं आहे...पण आम आदमी पक्ष हा दिल्लीतील मनसे होण्याची शक्यता जास्त आहे..

 आज ड्राईव्हरने मला जाता जाता प्रश्न विचारला, "मॅडम confuse हूं".. म्हटलं "क्या हुवा?"..तो म्हणाला, "किसको वोट दूं , अभी तक डिसाईड नहीं किया"...विचारलं.. " Option क्या है?"  तर  म्हणाला, "आप (आम आदमी पक्ष) और बीजेपी!"

                    अशीचं अवस्था अनेकांची आहे...आता मतं कोणाला जातयं याचं उत्तरं आठ डिसेंबरला मिळेल...

1 comment:

  1. केंद्र आणि दिल्ली सरकारवरच्या नाराजीचा फटका दिल्लीत शिला दीक्षितांना बसेल असं वाटतंय. पण त्यामुळे आम आदमी पक्षामुळे विरोधी मतांची विभाजन होऊन त्याचा फायदा काँग्रेसलाच होईल. त्यामुळे आम आदमी दिल्लीतला मनसे होणार पटलं. शीला दीक्षित या हुशार राजकारणी आहेत, त्यांना अगदीच आऊटडेटेत करता येणार नाही. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा सारख्या योजना, दिल्लीतल्या वाढीचा होणारा फायदा त्यांना होईल. त्यामुळे काँग्रेस मोठा पक्ष होईल असं मला वाटतं. ( 'आप' मुझॆ अच्छे लगने लगे हेच काँग्रेसवाल्यांचेो आवडते गाणे असेल.

    ReplyDelete